नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा
पाच ठळक गोष्टी नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा काय स्वरूप धारण करील हे ठरवतील. पहिली असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण ज्याचा पुरेसा ऊहापोह शिक्षणावरच्या लेखात झाला आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण जरी घटत चालले असले तरी त्यांचे प्रमाण एकूण वैद्यक व्यवसायामध्ये अगदी कमी होईल हे शक्य नाही. त्यामुळे सांसर्गिक व असांसर्गिक रोग्यांचा दुहेरी भार आपल्याला वाहावा लागणार आहे. …